परळी: महावितरण कार्यलय येथे महावितरण कार्यालयावर दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याच्या दणक्याने वाण धरणावरील डी.पी. उपलब्ध!
Parli, Beed | Oct 18, 2024 नागापूर येथे असलेल्या वाण धरणावरील डीपी गेल्या एक वर्षापासून पाणीसाठा आरक्षित करण्याच्या कारणामुळे महावितरण कार्यालयाच्या वतीने आणि तहसील प्रशासनाने काढून घेतल्या होत्या. मोटारीचे कनेक्शन तोडण्यात आले होते. मात्र यावर्षी पाऊस काळ समाधानकारक झाल्यामुळे वाण धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. या अनुषंगाने नागापूर जिल्हा परिषदेचे सदस्य प्रदीप भैय्या उर्फ बबलू शेठ मुंडे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली होती.