पवार साहेबांनी संधी दिली तर मी धनंजयचा पराभव करुन दाखवेन- ज्येष्ठ नेते फुलचंद कराड, नाथ नगर येथे
Parli, Beed | Oct 17, 2024 परळी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असुन या मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाकडुन उमेदवारीवर दावा ठोकत विधानसभा निवडणुकीसह,जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपालिका,ग्रामपंचायत अशा सर्व निवडणुकांच्या निमीत्ताने परळी मतदार संघात कायम चर्चेत राहिलेले राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) जेष्ठ नेते तथा भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी दावा ठोकत शरद पवार साहेबांनी मला संधी दिली तर या निवडणुकीत मी धनंजय मुंडे यांचा सहज पराभव करुन परळी विधानसभेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणार असल्याचा विश्वास पत्रकार परिषदेत केला.