नागपूर शहर: वृद्धेची हत्या करणाऱ्या चुलत नातवाला अवघ्या अर्ध्या तासात अटक; पाचपावली पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी : शिवप्रसाद पारवे सहाय्यक पोलीस आयुक्त
सहाय्यक पोलीस आयुक्त शिवप्रसाद पारवे यांनी 22 मे ला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लष्करीबाग परिसरात एका वृद्धेची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इंदू चव्हाण असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या अर्ध्या तासात आरोपी चुलत नातवाला अटक केली आहे. राजू बागडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याबद्दलची अधिक माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शिवप्रसाद पारवे यांनी दिली.