हवेली: मगरपट्टा उड्डाणपुलाखाली टेम्पोचालकाला मारहाण व शिवीगाळ करणा-या सुरज पाटीलला पोलीसांनी शिकवला चांगलाच धडा
Haveli, Pune | Oct 11, 2025 मगरपट्टा उड्डाणपुलाखाली टेम्पोचालकाला मारहाण व शिवीगाळ करणारा व टेम्पोची काच हॉकी स्टिकने फोडणा-या स्कुल बसचालक सुरज पाटीलला पोलीसांनी चांगलाच धडा शिकवला. ज्या ठिकाणी त्याने हे कृत्य केले त्याच ठिकाणी पोलीसांनी त्याची धिंड काढली. यानंतर या सुरज पाटीलने माफी मागितली.