नागपूर शहर: नागपुरात गुन्हे शाखेची धडक कारवाई; प्रतिबंधित सुगंधी तंबाखूसाठा जप्त
20 जूनला दुपारी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाने जरीपटका परिसरात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू विक्री करणाऱ्यावर कारवाई करत ४४,९७६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपी सुरज निरंजन मेश्राम याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून विविध कंपन्यांची प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि खर्रा बनवण्याची दोन यंत्रे असा एकूण किंमत ४४,९७६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.