जालना: जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी; अप्पर जिल्हादंडाधिकारी शशिकांत हदगल यांनी जारी केले आदेश
Jalna, Jalna | Mar 27, 2026 जालना जिल्ह्यात सन, उत्सवाच्या अनुषंगाने अप्पर जिल्हादंडाधिकारी शशिकांत हदगल यांनी जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंद आदेश जारी केलाय. शुक्रवार दि. 27 मार्च 2026 रोजी दुपारी 4 वाजता हा आदेश निर्गमीत करण्यात आलाय.दि.31 मार्च रोजी भगवान महावीर जयंती, 2 एप्रिलला हनुमान जन्मोत्सव, 3 एप्रिल रोजी गुड फ्रायडे तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी आणि 5 एप्रिल रोजी इस्टर संडे या सण, उत्सव आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेसाठी हा आदेश जारी केला.