लातूर : “लातूरकरांनो, कधी तुमच्या प्रॉपर्टी टॅक्सची पावती नीट पाहिली आहे का?” असा थेट सवाल करत आम आदमी पार्टीचे लातूर जिल्हाध्यक्ष अश्विन नलबले यांनी शहरातील नागरिकांना विचारात पाडले आहे. नलबले म्हणाले की, “आपल्याकडून सामान्य कर, वृक्ष कर, अग्निशामक कर, पथकर आणि शिक्षण कर अशा नावांनी दरवर्षी विविध कर आकारले जातात. पण प्रश्न असा आहे की महानगरपालिका प्रत्यक्षात या कराच्या मोबदल्यात सुविधा देते का? ”या प्रश्नांमुळे नागरिकांमध्ये चर्चेचा विषय निर्माण झाला आहे.