कांग्रेस, शेतकरी संघटना आणि मित्रपक्ष यांच्या संयुक्त पुढाकाराने स्थापन झालेल्या नगरविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अरुणभाऊ धोटे तसेच प्रभाग क्र. १ ते १० मधील सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आझाद चौक आणि जवाहर नगर येथे काल रात्री ९ वाजता जाहीर सभा घेण्यात आल्या. दोन्ही सभांना तसेच कार्नर सभांना हजारो स्वाभिमानी नागरिकांची उसळलेली गर्दी पाहता, राजुरा शहरातील जनतेचा विकासाभिमुख कल अधिक ठळकपणे दिसून आला.