भडगाव: कजगाव गोंडगाव रोडवर गोवंश वाहतूक करणारे वाहन पकडले, भगांव पोलिसात गुन्हा दाखल
भडगाव तालुक्यातील कजगाव येथे आज दिनांक १४ ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता गोवंश वाहतूक करणारे वाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कजगावजवळील गोंडगाव रोडवर थांबविले, वाहन चालकाच्या संशयास्पद हालचाली पाहून कार्यकर्त्यांनी सदर वाहनाची माहिती घेतली असता गोवंशाची वाहतूक केल्याचे लक्षात आले. त्यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी भडगाव पोलीस दाखल होऊन पोलीस कॉन्स्टेबल किशोर सोनवणे यांनी ताब्यात घेतले.