निफाड: मौजे सुकेणे आणि कसबे सुकेणे रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे समोर आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाने तातडीने पावले उचलत परिसरात पिंजरा लावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मौजे सुकेणे रेल्वे स्टेशन परिसरातील सुरेश बापूसाहेब भुजबळ यांच्या गट नंबर ३० मध्ये बिबट्याचे दर्शन झाले. याच भागात राहणारे सोनवणे आणि भाऊसाहेब भुजबळ यांच्या घरापाशी असल