अलिबाग: रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली
Alibag, Raigad | May 27, 2026 रायगड जिल्ह्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेसोबतच ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट गडद होऊ लागले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद रायगडच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत टंचाईग्रस्त भागात युद्धपातळीवर उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. 25 मे 2026 अखेर जिल्ह्यात एकूण 65 खासगी टँकर सुरू करण्यात आले असून, याद्वारे 64 गावे आणि 230 वाड्यांमधील 1 लाख 13 हजार 701 नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.