नागपूर शहर: किरकोळ वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; डोक्याला पडले ४६ टाके, मुख्य आरोपीसह तिघे अटकेत: शिवप्रसाद पारवे एसीपी
सहायक पोलीस आयुक्त शिवप्रसाद पारवे यांनी 1 जूनला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार लकडगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 'हलबा बार'मध्ये मद्यप्राशन करत असताना झालेल्या एका किरकोळ वादाचे पर्यावसान भीषण हिंसाचारात झाले. मोठ्या आवाजात बोलण्याच्या कारणावरून झालेल्या वादात विरल मजेठिया नावाच्या तरुणाने रुपेश सोनी यांच्यावर बिअरची बाटली आणि लोहेरी रॉडने प्राणघातक हल्ला केला. याबद्दलची अधिक माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शिवप्रसाद पारवे यांनी दिली आहे.