लातूर: मतदानाच्या १२ तास आधी निवडणूक स्थगित मतदान अधिकारावर गदा आणणारी लोकशाहीविरोधी कृती' - आमदार अमित देशमुख
Latur, Latur | Dec 1, 2025 लातूर जिल्ह्यातील निलंगा नगरपरिषद निवडणुकीला मतदानाला अवघे १२ ते १४ तास शिल्लक असताना स्थगिती देण्याचा निर्णय अनाकलनीय आणि धक्कादायक आहे. निवडणूक आयोगाची ही कृती जनतेच्या मतदान अधिकारावर गदा आणणारी आणि लोकशाहीविरोधी आहे, अशी तीव्र शब्दात टीका आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केली आहे.