नागपूर शहर: नागपूर पोलिसांची मोठी कामगिरी: पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीची बेळगावातून सुटका
5 मे ला रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात नागपूर गुन्हे शाखेच्या 'अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला' यश आले आहे. याप्रकरणी संशयित आरोपी पवन खलोदे यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.४ जानेवारी २०२५ रोजी ही मुलगी घरातून कोणालाही न सांगता निघून गेली होती. एका अज्ञात आरोपीने तिला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दिली होती. यावरून वाठोडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.