नागपूर शहर: घाट रोड जवळ बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू
30 जूनला रात्री 8 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे इमामवाडा हद्दीत घाट रोडवर चाळीस वर्षे व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळले होते त्यांना उपचाराकरता शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी प्राप्त सूचनेवरून पोलीस स्टेशन इमामवाडा येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.