नागपूर शहर: यशोधरा नगर पोलिसांची मोठी कारवाई: वाहनचोरी व घरफोडी करणाऱ्या टोळीला अटक: युनुसू शेख वरिष्ठ पोलीस निरीक्षक
यशोधरा नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांनी 15 जूनला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार,यशोधरा नगर पोलिसांनी वाहन चोरी आणि घरफोडी करणाऱ्या एका शातिर टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ आरोपींना अटक करून ८ गुन्हे उघडकीस आणले आहेत. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख यांनी दिली आहे.