नागपूर शहर: 'मतांचे विभाजन थांबवण्यासाठी सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र यावे'; नाना पटोलेंचे मोठे विधान
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आगामी राजकीय वाटचालीबाबत आणि देशभरातील राजकीय परिस्थितीवर महत्त्वाचे भाष्य केले आहे. देशात संविधान आणि लोकशाही धोक्यात असताना, भाजपला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येणे काळाची गरज असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे.