नागपूर शहर: आयपीएल सट्ट्यावर क्राईम ब्रांचचा छापा; ५ आरोपींना अटक: अभिजीत पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त
सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजीत पाटील यांनी 10 एप्रिलला सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार, बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सट्टेबाजीवर गुन्हे शाखा युनिट ३ ने मोठी कारवाई केली आहे. लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यावर सट्टा लावणाऱ्या ५ आरोपींना पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. आरोपींचे दुबईपर्यंत कनेक्शन असल्याचे तपासात उघडकीस आले आहे याबद्दलची सविस्तर माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजीत पाटील यांनी दिली आहे.