पनवेल: वाहन तपासणीदरम्यान मोटार वाहन निरीक्षकाला धक्काबुक्की
Panvel, Raigad | Jun 12, 2026 तळोजा एमआयडीसी परिसरात वाहन तपासणीची कारवाई करत असताना मोटार वाहन निरीक्षकाला धक्काबुक्की करून शासकीय कामकाजात अडथळा आणल्याची घटना घडली असून, याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश पाटील हे मोटार वाहन निरीक्षक म्हणून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जालना येथे कार्यरत आहेत. दरम्यान त्यांना परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य तसेच उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जालना यांच्या आदेशानुसार सध्या प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल येथे विशेष तपासणीसाठी नियुक्त आहेत.