नागपूर शहर: नागपुरात 'कामराज' नावाच्या बनावट औषधांचा पर्दाफाश : टीकाराम ठाकूर पोलीस निरीक्षक
गणेश पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टीकाराम ठाकूर यांनी 19 जूनला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार एफ डी ए आणि गणेशपेठ पोलिसांनी आयुर्वेद असल्याचे सांगून 'कामराज' कॅप्सूलची विक्री करणाऱ्या एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कॅप्सूलमध्ये घातक एलोपॅथिक औषधांची भेसळ असल्याचे प्रयोगशाळा चाचणीत निष्पन्न झाले. औषध निरीक्षकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी विविध मेडिकल स्टोअर्सवर छापेमारी करून साठा जप्त केला असून, संबंधितांवर फसवणुकीसह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याबद्दलची अधिक मा