जून महिन्यात काहीच पाऊस झाला नसला तरीही जुलै महिन्यात पावसाने दमदार बॅटिंग केली आहे. जुलैच्या सुरुवातीलाच झालेल्या जोरदार पावसामुळे गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोसेखुर्द धरणाचे ३३ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडून ३७०६.९८ क्युमेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.