Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
India
जनसमस्या
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Iyc
Bollywood
Patna
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Ahmedabad
Rahulgandhi
यूपी

हवेली: वानवडी येथे रेशनिंग दुकानातून निकृष्ट दर्जाचे गहु वितरण

Haveli, Pune | Nov 2, 2025
वानवडी येथील रेशनच्या दुकानांमध्ये निकृष्ट दर्जाच्या गव्हाचे वितरण होत असल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये सोनकिडे असलेला गहू,त्याचप्रमाणे कीड लागलेला गहू व मोठ्या प्रमाणात कचरा असलेला गहू हा नागरिकांना वितरित होत असल्याचे दिसून येत आहे.

MORE NEWS

मूकबधिर असल्याचा बनाव करत उच्चभ्रू सोसायटीतून ४ मोबाईल लंपास; भामटा CCTV मध्ये कैद"
.
. 
वडगाव शेरी (पुणे): पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये चोरीचा एक अतिशय अजब आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका अज्ञात चोरट्याने स्वतः मूकबधिर असल्याचा खोटा बनाव केला. शारीरिक व्यंग असल्याचे दाखवून त्याने लोकांची आणि सुरक्षा रक्षकांची सहानुभूती मिळवली आणि सोसायटीत प्रवेश केला. कोणालाही संशय येऊ न देता या भामट्याने इमारतीमधील तब्बल ४ महागडे मोबाईल फोन लंपास केले. हा सर्व प्रकार सोसायटीत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी स्थानिक रहिवाशांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस या भामट्याचा वेगाने शोध घेत आहेत.
.
.
.
#WadgaonSheri #PuneCrime #MobileTheft #CCTVFootage #PunePolice #SocietySecurity #KalyaniNagarArea #PuneNews #BreakingNews #CrimeUpdate #VimanNagarPolice

मूकबधिर असल्याचा बनाव करत उच्चभ्रू सोसायटीतून ४ मोबाईल लंपास; भामटा CCTV मध्ये कैद" . . वडगाव शेरी (पुणे): पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये चोरीचा एक अतिशय अजब आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका अज्ञात चोरट्याने स्वतः मूकबधिर असल्याचा खोटा बनाव केला. शारीरिक व्यंग असल्याचे दाखवून त्याने लोकांची आणि सुरक्षा रक्षकांची सहानुभूती मिळवली आणि सोसायटीत प्रवेश केला. कोणालाही संशय येऊ न देता या भामट्याने इमारतीमधील तब्बल ४ महागडे मोबाईल फोन लंपास केले. हा सर्व प्रकार सोसायटीत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी स्थानिक रहिवाशांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस या भामट्याचा वेगाने शोध घेत आहेत. . . . #WadgaonSheri #PuneCrime #MobileTheft #CCTVFootage #PunePolice #SocietySecurity #KalyaniNagarArea #PuneNews #BreakingNews #CrimeUpdate #VimanNagarPolice

Haveli, Pune | Jun 14, 2026

न्यूयॉर्क हादरले; वॉल स्ट्रीटजवळ वाहनाला आग लागून स्फोट, पर्यटकांमध्ये घबराट...
.
.
वॉल स्ट्रीटच्या मध्यभागी भीषण स्फोट!

न्यू यॉर्कमधील प्रसिद्ध 'वॉल स्ट्रीट बुल' (Toro de Wall Street) जवळ एका वाहनाला आग लागली आणि त्याचा भीषण स्फोट झाला. हा स्फोट शहरातल्या सर्वात जास्त गर्दीच्या आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या भागात झाल्यामुळे, तिथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आणि त्यांची पळापळ झाली. सुदैवाने, आतापर्यंत या घटनेत कोणीही जखमी झाल्याची माहिती नाही. प्रशासन आणि पोलीस अधिकारी सध्या या गाडीला आग लागल्याच्या कारणाचा कसून तपास करत आहेत.
.
.
.
#WallStreet #NewYork #Explosion #WallStreetBull #BreakingNews #USA #VehicleFire #WorldNews #NewYorkPolice

न्यूयॉर्क हादरले; वॉल स्ट्रीटजवळ वाहनाला आग लागून स्फोट, पर्यटकांमध्ये घबराट... . . वॉल स्ट्रीटच्या मध्यभागी भीषण स्फोट! न्यू यॉर्कमधील प्रसिद्ध 'वॉल स्ट्रीट बुल' (Toro de Wall Street) जवळ एका वाहनाला आग लागली आणि त्याचा भीषण स्फोट झाला. हा स्फोट शहरातल्या सर्वात जास्त गर्दीच्या आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या भागात झाल्यामुळे, तिथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आणि त्यांची पळापळ झाली. सुदैवाने, आतापर्यंत या घटनेत कोणीही जखमी झाल्याची माहिती नाही. प्रशासन आणि पोलीस अधिकारी सध्या या गाडीला आग लागल्याच्या कारणाचा कसून तपास करत आहेत. . . . #WallStreet #NewYork #Explosion #WallStreetBull #BreakingNews #USA #VehicleFire #WorldNews #NewYorkPolice

Haveli, Pune | Jun 14, 2026

आरोग्य यंत्रणा की कुस्तीचा आखाडा? शासकीय केंद्रावर प्रसूती कोण करणार यावरून डॉक्टर-नर्समध्ये राडा;
.
.
महाराष्ट्र: शासकीय आरोग्य केंद्रात डॉक्टरांच्या बेजबाबदारपणाची आणि अमानुशतेची एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसूतीसाठी आलेल्या एका गरोदर महिलेची डिलिव्हरी नेमकी कोण करणार, यावरून कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टर आणि नर्स यांच्यात जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की दोघींमध्ये थेट राडा सुरू झाला. एकीकडे आरोग्य कर्मचारी आपसात भांडण्यात मग्न असताना, दुसरीकडे प्रसूती कळा सोसणाऱ्या त्या असहाय्य महिलेची मोठी हेळसांड झाली. शेवटी कोणतीही वैद्यकीय मदत न मिळाल्याने त्या महिलेला अत्यंत गंभीर अवस्थेत दुसऱ्या खाजगी रुग्णालयात जावे लागले. या लाजिरवाण्या प्रकारामुळे शासकीय आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रचंड टीका होत असून दोषींवर कडक कारवाईची मागणी होत आहे.
.
.
.
#HealthDepartment #GovernmentHospital #MedicalNegligence #MaharashtraNews #HealthMinistry #PublicOutrage #DoctorVsNurse #BreakingNews #SarkariYantrana #PatientSafety

आरोग्य यंत्रणा की कुस्तीचा आखाडा? शासकीय केंद्रावर प्रसूती कोण करणार यावरून डॉक्टर-नर्समध्ये राडा; . . महाराष्ट्र: शासकीय आरोग्य केंद्रात डॉक्टरांच्या बेजबाबदारपणाची आणि अमानुशतेची एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसूतीसाठी आलेल्या एका गरोदर महिलेची डिलिव्हरी नेमकी कोण करणार, यावरून कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टर आणि नर्स यांच्यात जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की दोघींमध्ये थेट राडा सुरू झाला. एकीकडे आरोग्य कर्मचारी आपसात भांडण्यात मग्न असताना, दुसरीकडे प्रसूती कळा सोसणाऱ्या त्या असहाय्य महिलेची मोठी हेळसांड झाली. शेवटी कोणतीही वैद्यकीय मदत न मिळाल्याने त्या महिलेला अत्यंत गंभीर अवस्थेत दुसऱ्या खाजगी रुग्णालयात जावे लागले. या लाजिरवाण्या प्रकारामुळे शासकीय आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रचंड टीका होत असून दोषींवर कडक कारवाईची मागणी होत आहे. . . . #HealthDepartment #GovernmentHospital #MedicalNegligence #MaharashtraNews #HealthMinistry #PublicOutrage #DoctorVsNurse #BreakingNews #SarkariYantrana #PatientSafety

Haveli, Pune | Jun 14, 2026

खून प्रकरणातील आरोपींसोबत अर्धापूरच्या एपीआयचा वाढदिवस? व्हायरल व्हिडिओने पोलिसांची प्रतिमा ऐरणीवर...
.
.
अर्धापूर (नांदेड): अर्धापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) यांचा वाढदिवस चक्क खून आणि इतर गंभीर गुन्ह्यांमधील आरोपींसोबत साजरा झाल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये गंभीर गुन्हे दाखल असलेले आरोपी, काही पोलीस कर्मचारी आणि राजकीय कार्यकर्ते एकत्र केक कापताना आणि जल्लोष करताना दिसत आहेत. कायद्याचे रक्षकच गुन्हेगारांच्या गळ्यात गळे घालत असल्याचे समोर आल्याने नांदेड पोलीस प्रशासनाच्या प्रतिमेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
.
.
.
#Ardhapur #NandedNews #NandedPolice #MaharashtraPolice #KhakiInControversy #CrimeNews #PoliceAccusedNexus #ViralVideo #BreakingNews #ArdhapurPolice #ActionAgainstPolice

खून प्रकरणातील आरोपींसोबत अर्धापूरच्या एपीआयचा वाढदिवस? व्हायरल व्हिडिओने पोलिसांची प्रतिमा ऐरणीवर... . . अर्धापूर (नांदेड): अर्धापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) यांचा वाढदिवस चक्क खून आणि इतर गंभीर गुन्ह्यांमधील आरोपींसोबत साजरा झाल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये गंभीर गुन्हे दाखल असलेले आरोपी, काही पोलीस कर्मचारी आणि राजकीय कार्यकर्ते एकत्र केक कापताना आणि जल्लोष करताना दिसत आहेत. कायद्याचे रक्षकच गुन्हेगारांच्या गळ्यात गळे घालत असल्याचे समोर आल्याने नांदेड पोलीस प्रशासनाच्या प्रतिमेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. . . . #Ardhapur #NandedNews #NandedPolice #MaharashtraPolice #KhakiInControversy #CrimeNews #PoliceAccusedNexus #ViralVideo #BreakingNews #ArdhapurPolice #ActionAgainstPolice

Haveli, Pune | Jun 14, 2026

ब्राझीलमध्ये थरारक दुर्घटना; सुरक्षा दोरी न लावता बंजी जंप, २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू...
.
.
साओ पाउलो (ब्राझील): ब्राझीलमधील साओ पाउलो राज्यातील लिमेइरा येथील 'पुएन्ते डेल एस्केलेटो' (Skeleton Bridge) वर बंजी जंपिंग दरम्यान आयोजकांच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे एका २१ वर्षीय तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. मारिया एडुआर्डा रॉड्रिग्ज डी फ्रिटास (Maria Eduarda Rodrigues de Freitas) असे मृत तरुणीचे नाव आहे. एका खाजगी कंपनीने आयोजित केलेल्या या साहसी खेळात, प्रशिक्षकांनी (Instructors) मारियाच्या अंगाला सुरक्षा दोरी नीट न बांधताच तिला उडी मारण्याचा इशारा केला.

इशारा मिळताच मारियाने सुमारे ३० ते ३५ मीटर उंचीवरून थेट खाली उडी घेतली, मात्र कोणतीही दोरी नसल्याने ती थेट जमिनीवर कोसळली. हा सर्व थरार कॅमेऱ्यात कैद झाला असून उपस्थितांच्या किंकाळ्यांनी परिसर हादरला. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र गंभीर दुखापतींमुळे तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी मिलिटरी पोलिसांनी घटनेशी संबंधित ६ जणांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
.
.
.
#BrazilTragedy #BungeeJumping Accident #AdvenureSports #SafetyFirst #BreakingNews #BrazilNews #SocialMediaViral #HorrificAccident #WorldNews #InternationalCrime

ब्राझीलमध्ये थरारक दुर्घटना; सुरक्षा दोरी न लावता बंजी जंप, २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू... . . साओ पाउलो (ब्राझील): ब्राझीलमधील साओ पाउलो राज्यातील लिमेइरा येथील 'पुएन्ते डेल एस्केलेटो' (Skeleton Bridge) वर बंजी जंपिंग दरम्यान आयोजकांच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे एका २१ वर्षीय तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. मारिया एडुआर्डा रॉड्रिग्ज डी फ्रिटास (Maria Eduarda Rodrigues de Freitas) असे मृत तरुणीचे नाव आहे. एका खाजगी कंपनीने आयोजित केलेल्या या साहसी खेळात, प्रशिक्षकांनी (Instructors) मारियाच्या अंगाला सुरक्षा दोरी नीट न बांधताच तिला उडी मारण्याचा इशारा केला. इशारा मिळताच मारियाने सुमारे ३० ते ३५ मीटर उंचीवरून थेट खाली उडी घेतली, मात्र कोणतीही दोरी नसल्याने ती थेट जमिनीवर कोसळली. हा सर्व थरार कॅमेऱ्यात कैद झाला असून उपस्थितांच्या किंकाळ्यांनी परिसर हादरला. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र गंभीर दुखापतींमुळे तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी मिलिटरी पोलिसांनी घटनेशी संबंधित ६ जणांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. . . . #BrazilTragedy #BungeeJumping Accident #AdvenureSports #SafetyFirst #BreakingNews #BrazilNews #SocialMediaViral #HorrificAccident #WorldNews #InternationalCrime

Haveli, Pune | Jun 14, 2026

हवेली: वानवडी येथे रेशनिंग दुकानातून निकृष्ट दर्जाचे गहु वितरण - Haveli News