महागाव: संगम चिंचोली जवळ कारच्या धडकेत उटी येथील महिला ठार, पती व दोन लहान मुले गंभीर जखमी
उमरखेड तालुक्यातील संगम चिंचोली फाट्याजवळ २१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजताच्या दरम्यान भरभाव कार व दुचाकीचा भिषण अपघात झाला, या अपघातात दुचाकीवरील राणी प्रतीक कांबळे राहणार उटी तालुका महागाव याचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे पती प्रतीक कांबळे आणि दोन मुले ऋतुराज व आरुष गंभीर जखमी झाले. त्यांना नांदेड शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॅनियल बेल्युकोंडा राहणार नांदेड याने भरधाव कार चालवत प्रतीक कांबळे यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.