सेलू: कीन्ही येथे क्षुल्लक कारणातून मारहाण करीत परत दिली मारण्याची धमकी, सेलू पोलिसांत तक्रार दाखल
Seloo, Wardha | Oct 8, 2024 क्षुल्लक कारणातून वाद निर्माण करून तिघांनी मारहाण करून परत पुन्हा मारण्याची धमकी दिली. ही घटना तालुक्यातील कीन्ही येथे ता. 8 मंगळवारी दुपारी 1 वाजता घडली. याप्रकरणी सागर हरिभाऊ कुत्तरमारे वय 60 रा. कीन्ही यांनी पवन कुत्तरमारे, अस्मिता कुत्तरमारे व इंदिरा कुत्तरमारे तिघेही रा. कीन्ही यांचे विरुद्ध दुपारी 3 वाजता तक्रार दाखल केली आहे. अशी माहिती सेलू पोलिसांकडून प्राप्त झाली.