सेलू: हिंगणीचे प्राथमिक आरोग्य जिल्ह्यातील क्रमांक एकचे केंद्र : दत्ता मेघे इन्स्टिट्यूटचे कुलगुरू डॉ. ललित वाघमारे
Seloo, Wardha | Oct 7, 2024 जिल्ह्याच्या एका टोकावर असलेल्या हिंगणी येथे नव्यानेच स्थापन करण्यात आलेले प्राथमिक आरोग्य केंद्रातून परिसरातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील. आमदार भोयर यांच्या प्रयत्नाने भव्य अशी वास्तु उभी झाली आहे. जिल्ह्यातील क्रमांक एकचे हिंगणी येथील केंद्र झाले आहे, असे प्रतिपादन दत्ता मेघे ठन्सिटयुट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्चचे कुलगुरू डॉ. ललित वाघमारे यांनी केले. ते हिंगणी येथे ता. 7 सोमवारी सकाळी 11 वाजता प्रा. आ. केंद्राच्या उद्धाटन प्रसंगी बोलत होते.