सेलू: रेहकी येथे गावठी दारू विक्री करणाऱ्या तरुणास सेलू पोलिसांनी केली अटक, 50 लिटर मोहा दारुसह 10 हजार 400 चा मुद्देमाल जप्त
Seloo, Wardha | Oct 8, 2024 अवैधरित्या गावठी मोहा दारूची विक्री करणाऱ्या व्यक्तीच्या घरी सेलू पोलिसांनी धाड टाकून 50 लिटर मोहा दारुसह 10 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ता. 8 मंगळवारी दुपारी 4 वाजताचे दरम्यान रेहकी येथे करण्यात आली. याप्रकरणी रुपेश नारायण मुंगले वय 24 रा. रेहकी याचेवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली.