ठाणे: नवी मुंबईत स्पाच्या नावाखाली सुरू होता भलताच प्रकार, मग पोलिसांनी धाड टाकत केला पर्दाफाश,तब्बल 'इतक्या'महिलांची सुटका
Thane, Thane | Dec 2, 2025 नवी मुंबईच्या जुहू गाव येथे स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू होता. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी धाड टाकली आणि सहा महिलांची सुटका करत एका आरोपी महिलेला ताब्यात घेतले. मात्र एक मुख्य आरोपी फरार झाला असून त्याचा शोध देखील नवी मुंबई पोलीस घेत असल्याची माहिती मिळत आहे. अनेक ठिकाणी स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली जोर जबरदस्ती महिलांना वेश्याव्यवसाय करायला लावला जातो अशी धक्कादायक माहिती देखील मिळत आहे.