नागपूर शहर: पहाटेच्या वेळी सापांचे प्राण वाचवून सर्पमित्राने दिला 'जीवनदान'चा संदेश
आज दिनांक १ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास बेसा आणि दिघोरी परिसरात सर्पमित्र शुभम पराळे यांनी तत्परता दाखवत दोन सापांना सुरक्षितरीत्या जीवनदान दिले. पहिल्या घटनेत बेसा येथील रचना वाटिका सोसायटीत बाथरूमच्या जाळीत अडकलेल्या ४ फूट लांबीच्या बिनविषारी तस्कर सापाची सुटका केली. जाळीत अडकल्यामुळे साप जखमी झाला होता. सर्पमित्राने वेळीच हस्तक्षेप करून सापाची जाळीतून सुटका केली, जखमेवर मलमपट्टी केली आणि सापाला मटकाजरीच्या जंगलात सुरक्षित मुक्त केले.