🚨 पुणे रेल्वे स्थानकावर DRIची मोठी कारवाई!
मिझोराममधील 32 वर्षीय महिलेकडून तब्बल ₹3.41 कोटी किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. DRI अधिकाऱ्यांनी पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर ही कारवाई केली.
तिच्या बॅगेत 2,532 ग्रॅम क्रिस्टलसदृश पदार्थ तसेच विविध रंगांच्या गोळ्या आढळल्या. तपासणीत त्यामध्ये अॅम्फेटामाइन, क्रिस्टल मेथ आणि MDMA असल्याचे निष्पन्न झाले.
चौकशीत मैसूर येथे ही बॅग अन्य व्यक्तीकडे देण्याच्या सूचना मिळाल्याचे समोर आले असून, या प्रकरणामागे मोठे आंतरराज्यीय ड्रग तस्करी नेटवर्क असल्याचा संशय आहे.
आरोपी महिलेला अटक करण्यात आली असून, विशेष न्यायालयाने तिला DRI कोठडी सुनावली आहे.
📍 पुणे | महाराष्ट्र
🔴 अधिक माहितीसाठी Times of Maharashtra News फॉलो करा.
#Pune #PuneNews #PuneRailwayStation #DRI #DRIPune #MaharashtraNews #PuneCrime #DrugSeizure #DrugBust #DrugTrafficking #MDMA #CrystalMeth #Amphetamine #CrimeNews #BreakingNews #PuneUpdates #Maharashtra #IndiaNews #CrimeNewsIndia #TimesOfMaharashtra
Pune City, Pune | Aug 27, 2026