देऊळगाव राजा: ऊंबरखेड ऑटो अपघातातील जखमीं महिलेचा मृत्यू
ऑटो अपघातातील जखमीं महिलेचा मृत्यू देऊळगाव राजा : उंबरखेड गावाजवळ भरधाव वेगाने जात असलेला ऑटो पलटी होऊन झालेल्या अपघातातील जखमीं महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मृतक महिलेचामुलगा रामेश्वर गाटोळ याने पोलीस ठाण्यात आज दिनांक 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 फिर्याद दिली असून पोलिसांनी ऑटो चालक पुरुषोत्तम खांडेभराड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.