मिरज: माधवनगर मध्ये युवकावर चाकू हल्ला; महाप्रसादाच्या वेळी झाला होता वाद, दोघांवर संजयनगर पोलिसात गुन्हा दाखल
Miraj, Sangli | Sep 2, 2025 माधवनगर मध्ये महाप्रसादाच्या वेळी प्लेट घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादाच्या रागात एका तरुणावर चाकू हल्ला करून त्यास गंभीर जखमी केले. याप्रकरणी सुरेश गनपत खाडे, ( वय ५४ ) यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दस्तगिर गडकरी आणि अमिर गडकरी ( दोन्ही रा. शिवतेज कॉलनी कर्नाळ रोड, माधवनगर ) या दोघांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी हे शिवतेज कॉलनी कर्नाळ रोड, माधवनगर येथे गुलाब आलदर यांचे घरी भाडयाने राहतात. तर त्यांच्या घरासमोर दोघे संशयि