भंडारा: तुमसरातील धोकादायक गुंड MPDA कायद्यान्वये नागपूर कारागृहात स्थानबद्ध
भंडारा पोलिसांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तयारी करून तुमसरतील धोकादायक गुंडाला MPDA कायद्यान्वये नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे. पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ही मोठी कारवाई करण्यात आली.