लातूर: चंपाषष्ठीच्या दिवशी भाविकांचा उत्साह;
राम गल्ली येथील यथार्थची खंडेराय रूपात विशेष सजावट, व्हिडिओ व्हायरल
Latur, Latur | Nov 26, 2025 लातूर : चंपाषष्ठी निमित्त आज बुधवार दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी लातूर शहरासह जिल्हाभरातील मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी उसळली. मल्हार मार्तंड खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भक्तांची रांग लागली होती. ढोल-ताशांचा गजर, ‘ येळकोट येळकोट मल्हारा’च्या घोषणा आणि भक्तीभावाची लहर यामुळे शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.