नागपूर शहर: गर्लफ्रेंड ला गिफ्ट देण्यासाठी कपड्यांच्या दुकानात चोरी; अंबाझरी पोलिसांकडून दोन अल्पवयीन ताब्यात: PSI नंदकिशोर
पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर यांनी 2 जून ला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रविनगर चौक येथे गर्लफ्रेंड गिफ्ट देण्यासाठी कपड्यांच्या दुकानात चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपींकडून चोरीचा मोबाईल, ॲक्सेसरीज आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ९२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर यांनी दिली आहे.