🩸 सिकलसेल मुक्त गोंदियासाठी एक पाऊल... 'अरुणोदय' अभियानात सहभागी व्हा! 🩸 गोंदिया जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. एम. मुरगानंथम (IAS) यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना 'अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान' मध्ये सहभागी होण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे. सिकलसेल हा एक अनुवांशिक रक्तविकार असून, वेळेवर तपासणी केल्यास यावर प्रभावी नियंत्रण मिळवणे शक्य आहे. विशेषतः ० ते ४० वयोगटातील नागरिकांनी ही चाचणी करणे अत्यंत आवश्यक आहे.