नागपूर शहर: लिव्ह-इन पार्टनरच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या; आरोपी प्रियकर अटकेत : चेतन सिंह चौहान वरिष्ठ पोलीस निरीक्षक
बजाज नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन सिंह चौहान यांनी 5 वाजून 15 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूरमधील बजाजनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका धक्कादायक घटनेत, लिव्ह-इन पार्टनरच्या सततच्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. रेश्मा रेवतकर असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन सिंह चौहान यांनी दिली आहे.