रावेर: भालोद येथे ट्रॅक्टर येत आहे मोटरसायकल बाजूला कर अशा बोलण्याच्या कारणावरून एकाच दोघांची मारहाण,फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल
Raver, Jalgaon | Sep 22, 2025 भालोद या गावात स्वामीनारायण मंदिराजवळ रोहित उर्फ बुवा मधुकर लोखंडे व पंकज मोहन गिरासे हे दोघे मोटरसायकल वर उभे होते. तेव्हा त्यांना संदीप प्रमोद कोळी वय ४० याने सांगितले की आमचे ट्रॅक्टर येत आहे मोटरसायकल बाजूला करा. तेव्हा अशा बोलण्याच्या रागातून त्याला या दोघांनी शिवीगाळ करून मारहाण केली.फायटरने मारून दुखापत केली. तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.