अर्धापूर: अर्धापूर येथे विनापरवाना तिरट नावाचा जुगार पत्ते खेळत असताना आरोपी विरुद्ध अर्धापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
दिनांक 18 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान उमर कॉलनी अर्धापूर येथे, यातील आरोपी गजानन रूख्माजी पिंपळगावकर,वय 30 वर्षे, रा.आबाजी नगर अर्धापूर व इतर चार इसम हे विना परवाना बेकायदेशिररित्या तिरंट नावाचा जुगार पत्ते खेळत व खेळवित असतांना नगदी 7650/-रू,व मुद्देमालासह मिळून आले. फिर्यादी पोहेकॉ शिलराज केशवराव ढवळे,ने. पोस्टे अर्धापूर यांनी दिलेल्या फिर्यादवरुन अर्धापूर पोलीस स्टेशन मध्ये आरोपी गजानन पिंपळगावकर व इतर चार जनाविरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल असुन तपास सपोनि/बेमकेवाड, हे करीत