नागपूर शहर: नागपूर हादरले: पेट्रोल पंपावर दोन तरुणींमध्ये तुंबळ हाणामारी; व्हिडिओ व्हायरल
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील एका पेट्रोल पंपावर दोन तरुणींमध्ये किरकोळ कारणावरून जोरदार वाद झाला, ज्याचे रूपांतर अखेर हाणामारीत झाले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी आलेल्या दोन तरुणींमध्ये काही कारणावरून शाब्दिक वाद झाला.