पनवेल: उलवे नोडमधील मुरबा गणपती मंदिर भक्तांचे होतेय श्रद्धास्थान
Panvel, Raigad | Apr 6, 2026 पनवेल तालुक्यातील उलवे नोड मधील समुद्र किनारी वसलेले मोरावे येथील मुरबा गणपती मंदिर सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. पनवेल, ठाणे, भिवंडी, मुरबाड, नवी मुंबईतून संकष्टी चतुर्थीला गणेश भक्तांची प्रचंड गर्दी होत आहे. मुरबा गणपतीचे दर्शन घ्यायचे झाल्यास होडी हा एकमेव पर्याय होता. मात्र या होड्या छोट्या आहेत. भक्तांच्या सेवेसाठी आता यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे दोन पॅसेंजर बोटी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यामुळे भक्तगणांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.