औंढा नागनाथ: अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार, हिंगोली-परभणी मार्गावर जवळाबाजार शिवारातील घटना
हिंगोली ते परभणी मार्गावर औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना दिनांक ७ ऑक्टोबर मंगळवार रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे. राजकुमार रेश्माजी सोनवणे वय ३० वर्ष राहणार बाराशिव तालुका वसमत असे मृत्यू झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे माहिती मिळताच फटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेबाबत दिनांक ८ ऑक्टोबर बुधवार रोजी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत नोंद झाली नसल्याची माहिती हट्टा पोलिसांनी दिली