चांदूर बाजार: शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन हद्दीतील, भोंगाडे पुरा देऊरवाडा येथे घरफोडी, शिरजगाव कसबा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
आज दिनांक 4 जानेवारीला पोलीस सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन हद्दीतील देऊरवाडा भोंगाडे पुरा येथे, अज्ञात चोरट्याने घरफोडी करून अँड्रॉइड मोबाइल सह वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची तक्रार, नंदकिशोर रामदासराव तायडे यांनी दिनांक तीन जानेवारीला तीन वाजून 16 मिनिटांनी शिरजगाव कसबा पोलीस स्टेशनला दाखल केली आहे. पोलिसांनी, नितीन मधुकर सुसरे नावाच्या आरोपीला अटक करून ताब्यात घेतले आहे