विघ्नेश्वर प्राथमिक आश्रम शाळा, पिंपरी मोडक येथे विशेष गोवर-रुबेला लसीकरण मोहिम संपन्न
1.5k views | Karanja, Washim | Sep 25, 2025 वाशिम (दि.२५, सप्टेंबर):कारंजा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र धनज बुद्रुक अंतर्गत विघ्नेश्वर प्राथमिक आश्रम शाळा, पिंपरी मोडक येथे MR लसीकरण शिबिर घेण्यात आले. एकूण 133 विद्यार्थ्यांपैकी 126 विद्यार्थ्यांचे यशस्वी लसीकरण करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. रोशन राठोड यांनी विद्यार्थ्यांना लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगितले. कार्यक्रमात आरोग्य कर्मचारी व स्थानिक आरोग्य चमूने सक्रिय सहभाग नोंदविला.