नागपूर शहर: नागपुरात दिवसाढवळ्या घरफोडी; ९.७५ लाखांचा मुद्देमाल लंपास
14 मे ला दुपारी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने ७ लाख रुपयांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ९ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संत्रा मार्केट परिसरातील रतन प्लाझा येथील रहिवासी फिर्यादी श्रीमती भारती संदीप तिवारी या १३ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी १२:३० च्या दरम्यान आपल्या घराला कुलूप लावून पतीला डबा देण्यासाठी गेल्या होत्या.