नागपूर शहर: वाढदिवसाचा 'तो' व्हिडिओ ठरला महागात; पोलिसांनी मुलांचे केले समुपदेशन, जाहीर माफीनामा
कळमना परिसरातील धरमनगर भागात एका अल्पवयीन मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीत पिस्तूल हवेत फिरवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकारामुळे खळबळ उडाली होती. मात्र, तपासणीअंती ती पिस्तूल नसून खेळण्यातील बंदूक असल्याचे समोर आले. पोलिसांनी संबंधित मुलांची ओळख पटवून त्यांना समज दिली आणि त्यांचे समुपदेशन करून सोडून दिले.