पाचोरा: मौजे रामेश्वर येथील १११ पात्र भूमिहीन लाभार्थ्यांना डावलून अपात्र व्यक्तींना जमिनीचे वाटप केल्याचा आरोप, तक्रार दाखल,
पाचोरा तालुक्यातील मौजे रामेश्वर येथील १११ पात्र भूमिहीन लाभार्थ्यांना डावलून, नियमांचे उल्लंघन करत दुसऱ्याच गावच्या अपात्र व्यक्तींना जमिनीचे वाटपात भ्रष्टाचार केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मुकेश गांगुर्डे यांनी केला असून, याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीही निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे गांगुर्डे यांनी केली आहे.