दिनांक 12 डिसेंबर रोजी रात्री बाराच्या दरम्यान पाकीजा किराणा दुकान कंधार येथे, यातील फिर्यादीचे किराणा दुकानाचे टिन पत्रा कापुन आत प्रवेश करून किराणा माल, सिगारेट, तंबाखु काजु, बदाम किमती 67,500/- रू चा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला फिर्यादी शेख इम्राण आब्दुल खादर, वय 35 वर्षे, व्यवसाय व्यापार रा. विजय गड कंधार यांनी दिलेल्या फिर्यादवरुन कंधार पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोरटेविरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल असुन तपास पोहेकों डीकळे, हे करीत आहेत.