लातूर : शहरातील अवंती नगर भागातील साने गुरुजी माध्यमिक विद्यालयात शुक्रवार, दि. 21 नोव्हेंबर 2025 रोजी "नशा मुक्त भारत" अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना नशा विरोधी शपथ देण्यात आली. समाज आणि देशाच्या विकासात युवा पिढीचा वाटा महत्त्वाचा असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नशा विरोधी जनजागृती निर्माण करण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला.