नागपूर शहर: सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन, परिवाराने केली न्यायाची मागणी
11 एप्रिल ला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंजिपेठ भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून २६ वर्षीय सना अंजुम खान या विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान परिवाराने न्यायाची मागणी करत आरोपिंवर त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे. या घटनेत मृतक मुलीच्या भावाची व काकूची प्रतिक्रिया समोर आली आहे.