समुद्रपूर: सोनेगाव बेला रस्त्यावर अज्ञात वाहनाने कट मारल्याने दुचाकी अनियंत्रित होऊन झालेल्या अपघातात १ जण ठार, तर दोन जण जखमी
समुद्रपुर: शहरातील तिन मित्र सोनेगाव बेला येथून मोपेडने गावी परत येत असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या मोपेडला कट मारली यावेळी मोपेड अनियंत्रित होऊन तिघेही जमिनीवर कोसळले यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले असून मृतकाचे नाव सुमित वझे रा समुद्रपूर असे आहे.प्राप्त माहितीनुसार सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास समुद्रपुर येथिल सुमित यादवराव वझे वय वर्षे २७,आकाश कापकर वय ३० वर्ष व निखिल महाजन हे तिघे सोनेगाव बेला येथून मोपेडने येत असताना हा अपघात झाला.